new-img

वांबोरी उपबाजार आवारात मापांड्याना बंतोष ॲपचे ट्रेनिंग

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच राहुरीचे उपबाजार आवार असलेलं वांबोरी उपबाजार इथेही लवकरच डिजिटल कारभार होणार आहे. बंतोष ॲपच्या मदतीने वांबोरी उपबाजार आवारचे डिजिटलायझेशन होणार असून इथेही शेतमालाचे वजन, विक्री, व्यवहार आदी गोष्टी बंतोष ॲपच्या सहाय्याने ऑनलाईन पार पडणार आहेत. ह्याचीच पहिली सुरुवात म्हणून उपबाजार आवारातील मापाडी यांना बंतोष ॲपच्या वापराचे ट्रेनिंग देण्यात आले.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण बाबुराव तनपुरे, गोरक्षनाथ तुकाराम पवार (उपसभापती) आणि सर्व संचालक, तसेच सचिव भिकादास आसाराम जरे, संदिप अर्जुन पावले (सहाय्यक सचिव), ऋषिकेश रणजीत पानसंबळ (लिपीक) यांनी मंचर बाजार समितीत बंतोष ॲपच्या सहाय्याने होणारे कामकाज पाहून आपल्या इथेही बंतोष प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता लवकरच राहुरी आणि वांबोरी इथे बंतोष ॲप कार्यरत होणार आहे. दिनांक 11 ऑगस्ट रोजी उपबाजार आवारातील जवळपास 18 मापाड्यांना बंतोष ॲपचे अधिकारी निलेश पाटील, अनिकेत पानगव्हाणे यांनी ट्रेनिंग दिले.