अखेर कांदा व्यवहार पूर्ववत !
- By -
- Sep 08,2023
केंद्र सरकारने निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ केल्याने कोंडी झालेल्या कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली. शेतकऱ्यांची अडचण झाल्याने ठप्प पडलेले कांद्याचे व्यवहार गुरुवारपासून (दिनांक 24) पूर्ववत सुरू होणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत नाफेड, कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक होऊन त्यात हा निर्णय झाला.‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक ऋतेश चौहान, आमदार डॉ. राहुल आहेर, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडूकाका देवरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.