अंशदान आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या
- By -
- Oct 18,2023
राज्यातील प्रत्येक बाजार समितीला कृषि पणन मंडळाकडे वार्षिक अंशदान जमा करावे लागते. राज्य शासनाच्या 1988 च्या अधिसुचनेनुसार बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार अंशदानाचे दर निश्चित केलेले आहेत. कायद्यातील तरतूदीनुसार प्रत्येक बाजार समितीला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 2 महिन्यांचे आत आपली आर्थिक पत्रके कृषि पणन मंडळाकडे अंशदान आकारणीसाठी सादर करावी लागतात.