मंचर बाजार समितीत कांद्याचा भाव वधारला
- By -
- Oct 19,2023
मंचर बाजार समितीत मागील सहा महिन्याच्या तुलनेत रविवारी (दि. 8 ऑक्टोबर) झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली असून कांद्याला उच्चांकी 3001 रूपये बाजार भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी मंचरमध्ये कांद्याचे लिलाव होत असतात.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर मुख्य बाजार आवारात रविवारी, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी 18000 ते 20000 हजार कांदा पिशव्याची आवक झाली. यावेळी कांद्याला रुपये 3001 असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. खेड, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यायातील गावामधून मंचर बाजारात कांद्याची आवक होत असते.