new-img

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

2023-24 या कालावधीसाठी गव्हाचा हमी भाव 2,125 रुपये इतका होता. तो भाव आता तब्बल दीडशे रुपयांनी वाढला आहे. त्यामुळं आता गव्हाला प्रति क्विंटल 2275 रुपये भाव मिळणार आहे.

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या सहा पिकांचे नवे हमी भाव

गहू - 150
ज्वारी - 115
हरभरा - 105
मसूर - 425
मोहरी - 200
सूर्यफूल - 150