new-img

दिलासादायक निर्णय! धान उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ

आधारभूत किंमत खरेदी योजना 2023-24 अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) आणि रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीची नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 होती. शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी 2 हजार 183 रुपये आणि रागी (नाचणी) करिता 3 हजार 846 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.