ज्ञानात भर! सोयाबीनच्या 3 नवीन जाती विकसित
- By -
- Jan 05,2024
सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी आणि खरीप हंगामात उत्पादित होणारे तेलबिया पीक आहे. कोकण वगळता राज्यातील इतर भागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात सोयाबिन पिकाची लागवड पाहायला मिळते. सोयाबीन उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. तर, मध्यप्रदेश हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. इंदोर (मध्यप्रदेश) येथील कृषी शास्त्रज्ञांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनच्या तीन नवीन जाती विकसित केल्या आहेत. NRC 181, 188 आणि 165 अशा या नव्याने विकसित झालेल्या सोयाबीनच्या तीन जाती आहेत. याबाबत अद्याप अधिसूचना जारी करण्यात आलेली नसली तरीही, पुढील वर्षी अधिसूचना जारी होऊन हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.