new-img

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी 2024) संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. महिला, गरीब, शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिले गेल्याचे पाहायला मिळाले. निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या वतीने कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी देशापुढे मांडल्या.

सरकारच्या वतीने पिक कापणीनंतरच्या प्रक्रियेसाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक गुंतवणुकीला आणखी वाव देईल, असे सीतारमण यांनी जाहीर केले. सरकारच्या वतीने 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्कही सुरु करण्यात येणार आहे. राई, तीळ, शेंगदाणा यांसारख्या पिकांच्या उत्पादनाला सरकार आणखी प्राधान्य देणार असून मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देणार आहे. कृषी क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या मागणी, साठवण आणि पुरवठा या साखळीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.