new-img

अमरावती जिल्ह्यात देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार

अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरेदीदारांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील संत्रे जगभरात प्रसिद्ध आहेत. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात संत्राचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

येथे शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात. यासह शेतकऱ्यांनी आणलेला संत्राला डिजिटल मशीनमध्ये टाकण्यात येतो. यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केला जातो. याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो. यावर्षी संत्र्याला 106 रुपये किलो असा भाव मिळालाय. त्यामुळे परिसरातीलच नाही तर नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी सुद्धा संत्रा वरुड बाजार समितीत विकण्यास आणत आहे.