new-img

बिजोत्पादन शेतकऱ्यांसाठी खूशखबर! एमएसपीतील फरकाची रक्कम मिळणार

राज्यातील बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती आधारीत दर आणि पीकनिहाय शासन घोषित एमएसपी यातील फरकाची रक्कम महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला व राष्ट्रीय बीज निगम, पुणे यांच्या मार्फत सन 2022-23 मध्ये बिजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करणेसाठीच्या कृषी आयुक्तालयाच्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिलेली आहे. त्यासाठी 4 कोटी 12 लाखांचा निधी सन 2021-22 मधील बिजोत्पादक शेतकऱ्यांकरिता वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच सन 2022-23 मधील बिजोत्पादक शेतकऱ्यांकरिता 13 कोटी 38 लाख निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर उर्वरित 4 कोटी 89 लाख निधी वितरीत करण्याकरिता कृषि आयुक्तालयाने केलेल्या विनंतीनुसार वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे.