new-img

आंबा निर्यातीसाठी मुंबई बाजार समितीचे मार्केट 24 तास खुले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आंबा विक्रीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोकणच्या हापूससह गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व केरळवरून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी 300 ते 500 कोटी रुपयांची उलाढाल आंबा हंगामामध्ये होत असते. येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते.

बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये 41 निर्यातदारांची कार्यालये आहेत. बाजार समितीने स्वतंत्र निर्यातभवन इमारतही बांधली आहे. आंबा हंगामामध्ये निर्यातीसाठी 24 तास मार्केट खुले केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यामधील निर्यातक्षम आंब्याची निवड, पॅकिंग व इतर प्रक्रिया पुर्ण करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत.