शेतकऱ्यांना मिळणार युरिया, केंद्राने दिली युरिया आयात करण्याची परवानगी
- By - Team Agricola
- Mar 20,2024
शेतकऱ्यांना मिळणार युरिया, केंद्राने दिली युरिया आयात करण्याची परवानगी
केंद्र सरकारने युरिया आयातीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता देशातील सर्व राज्यांना युरिया २५ मार्च २०२५ पर्यंत आयात करण्याची परवानगी दिली आहे. देशात युरियाची गरज असते. दरवर्षी देशात ३६० लाख टन युरिया ची आवश्यकता असते. यामुळेच केंद्र सरकारने युरिया आयात करण्यास राज्यांना परवानगी दिली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरिया ची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असुन आता देशाबाहेरून आधिक युरिया आयात होणार आहे. याचा निश्चितच फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. तस तर देशातील वार्षीक युरियाचा वापर सुमारे ३६० लाख टन होतो. गेल्या वर्षी युरियाचा वापर देशात सुमारे ३५७ लाख टन नोंदवला गेला होता. या ३५७ लाख टना पैकी भारताला ८० लाख टन युरिया आयात करावी लागली होतीयंदाच्या हंगामात देशात युरियाचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील युरिया चा प्रश्न मिटणार आहे.