सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षाही कमी दर, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
- By - Team Agricola
- Mar 22,2024
सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षाही कमी दर, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
सध्या गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात घट होत आहे. या दरात घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या सोयाबीनला सरासरी भाव ४३०० ते ४४०० रूपये प्रतिक्विंटल मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनच्या दबावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सोयाबीनला केंद्र सरकारने ४६०० रूपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. अगदी शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने सोयाबीन ची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. दरवाढ होत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. सोयाबीन विकावी की ठेवावी प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. तर काही शेतकरी तर सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे कारण सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाही.त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार सध्या बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात असे अभ्यासक म्हणत आहे.