new-img

कांद्याच्या दरात घसरण, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

कांद्याच्या दरात घसरण, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

लासलगाव बाजारसमितीत मागील काही दिवसांपासुन कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. २३ मार्च रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत  ४००० क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आहे. तर या कांद्याला सर्वाधिक भाव १४५२ रूपये मिळाला आहे. तर इतर कांद्याला सरासरी १३५० रुपये भाव मिळाला. सर्वात कमी भाव हा ७०० रूपये मिळाला आहे.

कांद्याच्या दरात होणाऱ्या सतत घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. सध्या बाजारसमितीत मागील काही दिवसांपासुन कांद्याच्या भावात सतत घसरण होत आहे. तर सध्या लाल कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते १३०० रूपयांपर्यंत दर मिळत असुन उन्हाळ कांद्याला सरासरी १३०० रूपये दर मिळत आहे. १५ दिवसांपासुन सलग दरात चढ-उतार होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसत आहे.उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. तर सध्या उन्हाळ कांद्याला लाल कांद्यापेक्षा आधिक भाव मिळत आहे परंतु सततच्या घसरणीमुळे कांदा उ्तपादक शेतकरी अडचणीत आले आहे.