हरभऱ्याची आवक मंदावली
- By - Team Agricola
- Mar 23,2024
हरभऱ्याची आवक मंदावली
हरभऱ्याचा हमीभाव यंदा केंद्र सरकारने ५ हजार ४४० रुपये जाहीर केला आहे. हरभऱ्याला ५,४०० ते ६ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. सध्या हरभऱ्याचे भाव टिकून आहेत.अभ्यासकांच्या अंदाजानुसार, भाव आणखी काही काळही टिकून राहू शकतो. रंतु सध्या हरभरा आवक मंदावली देखील आहे.
सध्या बाजार समितीत हरभऱ्याची आवक पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासुन राज्यात हरभऱ्याची आवक मंदावली आहे. २२ मार्च रोजी राज्यात हरभऱ्याची ४६ हजार ७८० क्विंटल आवक झाली आहे. या हरभऱ्याला जास्तीत जास्त दर ६ हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. तर सरासरी दर हा ५४०० ते ६००० पर्यंत आहे. हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. तर व्यापारांच्या म्हणण्याप्रमाणे तर यंदा यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो.