कापसाला मिळतोय ७५०० हजारापर्यंत भाव
- By - Team Agricola
- Mar 25,2024
कापसाला मिळतोय ७५०० हजारापर्यंत भाव
सध्या बाजारपेठेत कापसाच्या भावात नरमाई दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासुन कापसाच्या भावात सतत चढउतार होत आहे. सध्या कापसाला सरासरी ७३०० ते ७६०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. कापसाला हमीभावाइतका भाव मिळत आहे. दरात ३०० रूपयांच्या आसपास घसरण होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासुन कापसाच्या भावात नरमाई येत आहे. मागील आठवड्यात कापसाच्या भावात जवळपास ३०० रूपयांची घसऱण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर कापसाला सरासरी भाव हा ७३०० ते ७६०० च्या दर म्यान मिळत आहे. कापसाचे भाव पुढील काळातही टिकून राहू शकता असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव नरमले आहेत आणि त्याचा परिणाम देशातील बाजारावर होतांना पाहायला मिळत आहे. कापसाच्या भावात घसरण झाल्यामुळे कापसाचे भाव वाढतील का असा प्रश्न शेतकऱ्यांच्यापुढे आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.