हरभरा दरात काहीशी घसरण
- By - Team Agricola
- Mar 29,2024
हरभरा दरात काहीशी घसरण
मागील गेल्या अनेक दिवसांपासुन शेतमालाच्या भावात चढउतार होत आहे. सध्या हरभऱ्याच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. देशभरात अनेक बाजारसमितींमध्ये हरभऱ्यााला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज उमरखेड बाजारसमितीत येथे हरभऱ्याला सरासरी दर हा ५३५० रूपये मिळाला आहे. कमीत कमी दर हा ५३०० ते जास्तीत जास्त दर हा ५४०० रूपये मिळाला असुन आज या बाजारसमितीत १०० क्विंटल लाल हरभऱ्याची आवक झाली आहे. केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. जळगाव बाजारसमितीत आज चाफा हरभऱ्याची ८ क्विंटल आवक झाली. तिथे हरभऱ्याला सरासरी दर ५३५५ रूपये मिळाला. कमीत कमी दर व जास्तीत दर हा ५३५५ रूपये मिळाला. पण अनेक बाजारसमितींमध्ये हमीभावपेक्षा ही कमी किंवा त्या दरम्यान दर मिळत आहे.