सोयाबीनला मिळतोय कमी दर
- By - Team Agricola
- Mar 30,2024
सोयाबीनला मिळतोय कमी दर
सध्या सोायाबीनच्या भावात सतत चढउतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरुच आहेत.३० मार्च रोजी नागपूर येथे लोकल सोयाबीनची ११४ क्विंटल सोयाबीन ची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी दर हा ४२७३ मिळाला. त्याच बाजारसमितीत कमीत कमी दर हा ४१०० तर जास्तीत दर हा ४३३१ मिळाला.जळगाव बाजारसमितीत आज ७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असुन सरासरी दर ४१७५ रूपये मिळाला.कमीत कमी दर हा व जास्तीत दर ४१७५ रूपये मिळाला.
भोकदन बाजारसमितीत पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४३०० रूपये दर मिळाला आहे.सध्या सोयाबीनच्या भावाची सरासरी भावपातळी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवकही कायम आहे. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते ही परिस्थिती आणि काही आठवडे दिसू शकते.