तुरीला मिळाला समाधानकारक दर, काय मिळतोय दर?
- By - Team Agricola
- Apr 09,2024
तुरीला मिळाला समाधानकारक दर, काय मिळतोय दर?
बाजारसमितींमध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात ही चांगलीच सुधारणा आली आहे. तुरीला सध्या सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार मिळत आहे. तर काही बाजारसमितीत तुरीचे दर १० हजारांच्या वर गेले आहेत.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ८ एप्रिल रोजी अंमरावती बाजारसमितीत तुरीला १२ हजारापर्यंत दर मिळत आहेै. या बाजारसमितीत सरासरी दर हा ११७०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ३२७० लाल क्विंटल तुरीची आवक झाली आहे. नागपूर बाजारसमितीत देखील तुरीला १२००० हजारांपर्यंत भाव मिळाला असुन आवक २२३१ क्विंटल लाल तुरीची झाली आहे.
बाजारातील आवक घटली आहे. यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.