कांद्याला आज काय मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 10,2024
कांद्याला आज काय मिळतोय बाजारभाव?
शेतमालाच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहे. उन्हाळी कांद्याला कमीतकमी दर हा १०० रूपये मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कांद्याला सरासरी भाव हा सध्या १३५० रूपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज १० एप्रिल रोजी कांद्याला मुंबई कांदा-बटाटा मार्केट मध्ये सरासरी दर हा १३५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत कांद्याची आवक ७ हजार ५१८ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. पुणे बाजारसमितीत कांद्याला सरासरी बाजारभाव हा १ हजार रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ६४९० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. पुणे- पिंपरी बाजारसमितीत कांद्याची आवक ही १३ क्विंटल झाली असुन सरासरी दर हा ११५० रूपये मिळाला आहे.
कांदा भावात सतत घसरण होत आहे. उन्हाळी कांद्याला सर्वात कमी क्विंटलला १०० रूपये दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.