new-img

तुर दरातील तेजी कायम, तुरीला किती मिळतोय दर?

तुर दरातील तेजी कायम, तुरीला किती मिळतोय दर?

तुरीच्या दरात चांगलीच सुधारणा आली आहे. सध्या बाजारात तुरीची मागणी वाढत आहे. तुरीला सरासरी १२००० हजारांपर्यंत देखील दर मिळत आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार तुरीला आज १० एप्रिल रोजी जळगाव बाजारसमितीत ९ हजार ५०० रूपयाचा दर मिळत आहे. कमीतकमी दर हा ९५०० ते जास्तीत दर हा ९५०० रूपये मिळत असुन या बाजारसमितीत ३ क्विंटल तुरीची आवक झाली आहे.

परतुर कृषी उत्पन्न बाजारसमितीत तुरीला ९ हजारांचा दर मिळत असुन या बाजारसमितीत पांढऱ्या तुरीची आवक ही ८ क्विंटल झाली आहे. कळमना बाजारसमितीत तुरीला सध्या १२००० हजारांपर्यंत दर मिळत आहे. तुरीला दिलासादायक दर मिळत असल्याने तुर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.