लसणाच्या भावात काहीशी नरमाई
- By - Team Bantosh
- Apr 11,2024
लसणाच्या भावात काहीशी नरमाई
सध्या कांद्याच्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आता मागील काही दिवसांपासुन लसणाच्या दरात काहीशी नरमाई आली आहे. आवक वाढली आहे त्यामुळे दरात काहीशी नरमाई आली आहे. सध्या बाजारसमितीत लसणाला सरासरी प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
लसणाचे दर काही मागील काही महिन्यांपुर्वी गगनाला भिडले होते. परंतु आता लसणाच्या दरात काहीशी नरमाई आली असुन लसणाच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत घट आली आहे. किरकोळ बाजारातही लसणाच्या दरात घसरण आली आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढील काही दिवस या दरात असेच चढउतार राहण्याची शक्यता आहे.