हळदीची आवक घटली, दरात तेजी किती मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 15,2024
हळदीची आवक घटली, दरात तेजी
किती मिळतोय बाजारभाव?
गेल्या काही दिवसांपासुन हळदीच्या दरात चांगली तेजी आली आहे. बाजारातील हळदीची आवक घटली आहे. त्यामुळे हळदीला मागणी वाढत असल्याने दरात तेजी आली आहे. दरात तेजी आल्याने हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील आठवड्यात राजापुरीला हळदीला चांगला दर मिळाला आहे. राजापुरी हळदीला सरासरी बाजारसमितीत २१,७५० रूपये दर मिळाला आहे. जवळपास हळदीच्या उत्पादनात या वर्षी ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. हळद व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हळदीचे दर यंदा तेजीतच राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीला यंदा चांगली मागणी आहे. हळदीची आवक घटली आहे. हळदीची आवक यापुढेही कमी असणार आहे. त्यामुळे हळदीला चांगले दर मिळणार आहे.