लाल मिरचीच्या दरात काहीशी नरमाई
- By - Team Agricola
- Apr 15,2024
लाल मिरचीच्या दरात काहीशी नरमाई
दरवर्षीपेक्षा काही प्रमाणात यंदा लाल मिरचीचे दर हे कमी झाले आहेत. लाल मिरचीच्या दरात काहीशी नरमाई आल्याने ग्राहकांमध्ये समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या बाजारसमितींमध्ये लाल मिरचीच्या दरात चढउतार सुरू आहे. नागपुर बाजारसमितीत आज लाल मिरचीला सरासरी दर हा ११५०० रूपये दर हा मिळाला आहे. तर कमीतकमी दर हा ४००० ते जास्तीतजास्त दर हा १४ हजार रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत लोकल मिरचीची २३२६ क्विंटल आवक झाली आहे. मुंबई बाजारसमितीत लाल मिरचीला सरासरी दर हा ३२५०० रूपये मिळाला आहे. कमीतकमी दर हा २३००० तर जास्तीत जास्त दर हा ४२ हजारांपर्यंत मिळाला आहे. या बाजारसमितीत २४४ क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे.
अनेक बाजारसमितींमध्ये मिरचीला सध्या गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे.