new-img

हरभरा उत्पादनात घट, दरात तेजी कायम

हरभरा उत्पादनात घट, दरात तेजी कायम 

यंदा कांदा, सोयाबीन या पिकांनी शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलं आहे. त्यातच सुरवातीला हरभऱ्याला कमी दर मिळत होता. परंतु दुष्काळ आणि अवकाळीमुळे उत्पादन घटलं आणि आता बाजारात हरभऱ्याची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासुन हरभरा दरात काहीशी सुधारणा आली आहे.
बाजारात सध्या हरभऱ्याला सरासरी दर हा ५ हजार २०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत. देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढलेले आहेत. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली.
अभ्यासकांच्या मते दरात ५ ते १० टक्क्यांची सुधारणा होऊ शकते. लोकसभा निवडणुक होईपर्यंत हरभऱ्याच्या भावात पुढील महिना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला.