कापसाला किती मिळतोय बाजारभाव
- By - Team Agricola
- Apr 18,2024
कापसाला किती मिळतोय बाजारभाव
कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासुन चढउतार सुरूच आहेत. सध्या कापसाला सरासरी दर हा ७ हजार ते ७ हजार ४०० रूपये मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १७ एप्रिल रोजी कापसाला सरासरी दर हा वरोरा बाजारसमितीत ६९०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत १२४३ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. पारशिवनी बाजार समितीत कापसाला सरासरी दर हा ७१५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत बुधवारी ४८८ क्विंटल कापसाची आवक झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाली. कापसाचे उत्पादन घटले. त्यामुळे मागणी वाढणार आहे. अभ्यासकांच्या मते हे दर वाढण्याची शक्यता आहे. कापसाचे भाव सध्याच्या पातळीवरून आणखी 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.