हळदीला सर्वाधिक भाव कुठे?
- By - Team Agricola
- Apr 18,2024
हळदीला सर्वाधिक भाव कुठे?
बाजारात हळदीच्या दरात चांगली सुधारणा आली आहे. हळदीला मागणी देखील वाढली आहे. राजापुरी हळदीला बाजारसमितीत सर्वाधिक दर मिळत आहे. हळदीला चांगला दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहे.
बाजारसमितींमध्ये लोकल, राजापुरी, नं १ या हळदीची आवक होत आहे. हळदीला गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे, यंदा राजापुरी हळदीला सर्वाधिक दर हा सांगली बाजारसमितीत मिळाला आहे. हळदीने यंदा उच्चांकी दर गाठला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १६ एप्रिल रोजी सांगली बाजारसमितीत राजापुरी हळदीला सरासरी दर हा १९ हजार ८०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत हळदीची आवक ही १६९९७ क्विंटल झाली. तर १५ एप्रिल रोजी सांगली बाजारसमितीत हळदीला दर हा १८०२५ रूपये मिळाला आहे.
लोकल हळदीला सध्या सरासरी दर हा १२ हजारांच्या पुढे मिळत आहे. बाजारसमितींमध्ये हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.