सोयाबीनच्या भावात होतेय घसरण, काय मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 19,2024
सोयाबीनच्या भावात होतेय घसरण, काय मिळतोय बाजारभाव?
सोयाबीनच्या दरात सतत चढउतार सुरू आहे. सोयाबीनला सध्या सरासरी हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर सोयाबीन विकावी की ठेवावी असा प्रश्न उभा राहीला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार सोयाबीनला १९ एप्रिल रोजी दर हा अमरावती बाजारसमितीत ४४३७ रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत सोयाबीनची ६९६१ क्विंटल आवक झाली आहे. उमरखेड बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर हा ४४५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत सोयाबीनची आवक ही ३०० क्विंटल झाली आहे.
सोयाबीनला सध्या हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. काही बाजासमितीत सोयाबीनला हमीभावादरम्यान दर मिळत आहे.