new-img

आज कांद्याला किती मिळतोय बाजारभाव?

आज कांद्याला किती मिळतोय बाजारभाव? 

कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. कांदा बाजारातील आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. सध्या कांद्याला सरासरी दर हा ७५० ते १४०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. कांदा दराच्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. 

आज २३ एप्रिल रोजी कांद्याला सरासरी भाव हा नागपुर बाजारसमितीत १४५० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत २०८० क्विंटल कांद्याची आवक झाली असुन कमीतकमी दर हा १ हजार रुपये मिळाला आहे.

पुणे बाजारसमितीत ११ हजार रुपये लाल कांद्याला दर मिळाला असुन या बाजारसमितीत ११ हजार २४ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. सर्वात कमी दर आज छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत लाल कांद्याला मिळाला आहे. लाल कांद्याला या बाजारसमितीत सरासरी दर हा ७५० रुपये मिळाला आहे. कांदा दरात गेल्या अनेक दिवसांपासुन घसरण सुरु असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.