लाल हरभऱ्याला किती मिळतोय बाजारभाव
- By - Team Agricola
- Apr 26,2024
लाल हरभऱ्याला किती मिळतोय बाजारभाव
बाजारसमितीत लाल हरभऱ्याला समाधानकारक दर हा मिळत आहे. सध्या बाजारसमितीत हरभऱ्याची आवक कमी झाली असुन दरात काहीशी सुधारणा आली आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार हरभऱ्याला सरासरी दर हा ८ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. जळगाव बाजारसमितीत गुरवारी बोल्ड हरभऱ्याला दर हा ८ हजार रुपये मिळत असुन या बाजारसमितीत ६ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. याच बाजारसमितीत चाफा हरभऱ्याला सरासरी दर हा ७ हजार २०० रूपये मिळत असुन १२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे.
सध्या हरभऱ्याला हमीभावादरम्यान त्यापेक्षाही जास्त दर हा बाजारसमितीत मिळत आहे. आवक कमी झाली असुन बाजारात मागणी वाढल्याने दरात सुधारणा आली आहे.