राज्यात कापसाला ८ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव
- By - Team Agricola
- Apr 26,2024
राज्यात कापसाला ८ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव
राज्यात बाजारसमितींमध्ये कापसाला हमीभावादरम्यान त्यापेक्षाही जास्त दर मिळत आहे. एकीकडे कांदा, सोयाबीन दरात घसरण सुरू आहे. कापसाला समाधानकारक दर मिळाल्याने कापुस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे. कापसाला सध्या सरासरी दर हा ६ हजार रुपये ८ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार कापसाला सरासरी दर हा बाजारसमितीत २६ एप्रिल रोजी कापसाला सरासरी दर हा फुलंब्री बाजारसमितीत ६९०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कापसाची आवक ही १८७ क्विंटल झाली असुन कमीतकमी दर व जास्तीत जास्त दर हा ६९०० रूपये मिळाला आहे. याच बाजारसमितीत २५ एप्रिल रोजी सरासरी दर हा ८००० हजारपर्यंत मिळाला आहे.
काही बाजारसमितीत सध्या कापसाला समाधानकारक दर मिळत आहे. शेतकऱ्यांना दर हा १० हजार रुपयांपर्यंत जावा अशी आशा आहे. बाजारअभ्यासकांच्या मते दर हा अजुन वाढणार आहे.