लिंबाचे दर वाढ होण्याची शक्यता
- By - Team Agricola
- May 01,2024
लिंबाचे दर वाढ होण्याची शक्यता
सध्या बाजारात लिंबाला समाधानकारक भाव हा मिळत आहे. लिंबाला सरासरी बाजारभाव हा ६ हजार ते ९ हजार प्रतिक्विंटलच्या दरम्यान मिळत आहे. किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री ही १० रूपयांनी होत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार लिंबाला ३० एप्रिल रोजी कल्याण बाजारसमितीत हायब्रीड लिंबाला सरासरी दर हा १० हजार ५०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत लिंबाची आवक ही ३ क्विंटल झाली आहे. राहता बाजारसमितीत ९ हजार ५०० रूपये दर मिळाला असुन या बाजारसमितीत लिंबाची आवक ही ५ क्विंटल झाली आहे.
सोलापुर बाजारसमितीत लिंबाला ७ हजार रूपये, पुणे-मोशी बाजारसमितीत सरासरी दर हा ७ हजार रुपये दर हा मिळाला आहे.
सध्या बाजारात लिंबाची आवक कमी झाली असुन दरात सुधारणा झाली आहे त्यामुळे लिंबु उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.