हरभऱ्याला बाजारसमितीत किती मिळतोय दर?
- By - Team Agricola
- Aug 06,2024
हरभऱ्याला बाजारसमितीत किती मिळतोय दर?
बाजारसमितींमध्ये शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला समाधानकारक भाव हा मिळत आहे. हरभऱ्याची आवक कमी झाल्यामुळे हरभरा दरात तेजी आली आहे. शेतकऱ्यांच्याहरभऱ्याला सरासरी दर हा बाजारसमितीत ७५०० रूपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार ६ ऑगस्ट २०२४ हरभऱ्याला पुणे बाजारसमितीत सरासरी बाजारभाव हा ७४०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ७००० ते जास्तीतजास्त बाजारभाव हा ७८०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ४० क्विंटल हरभऱ्याची आवक झालेली आहे. अमरावती बाजारसमिती हरभऱ्याला सरासरी बाजारभाव हा ६६६ क्विंटल आवक झालेली आहे. कमीतकमी भाव हा ६७०० आणि जास्तीतजास्त भाव हा ७००० रूपये मिळाला आहे. सरासरी भाव हा ६८५० रूपये मिळाला आहे. त्यानंतर बीड कृषी उत्पन्न बाजारसमितीत लाल हरभऱ्याला सरासरी बाजारभाव हा ६५८४ जास्तीतजास्त भाव हा ७३५० रूपये मिळाला आहे. कमीतकमी भाव हा ५७०१ रूपये मिळाला आहे. बाजारअभ्यासकांच्या मते हरभरा भावातील ही तेजी अजुन काही दिवस अशीच राहू शकते.