new-img

हरभरा दर तेजीत, मिळतोय ८००० पर्यंत दर

हरभरा दर तेजीत, मिळतोय ८००० पर्यंत दर

यंदा शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला चांगला दर हा बाजार समितीत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पिक घेण्याकडे चांगलाच कल वाढला आहे. 
सध्या बाजार समितीमध्ये सरासरी हरभऱ्याला 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दर हा मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक ही फार कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हदभराला सरासरी समाधानकारक असा दर हा बाजार समितीत मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे अधिकृत माहितीनुसार 21 ऑगस्ट 2024 रोजी कल्याण बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी दर हा 750 रुपये मिळाला आहे या बाजार समितीत कमीत कमी दर हा 7600 ते जास्तीत जास्त दर हा 7900 मिळाला असून तीन क्विंटल केवळ हरभऱ्याची आवक झाली आहे. आज रोजी चांदूर बाजार समितीत केवळ दोन क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. या बाजार समितीत हरभऱ्याला 7450 रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त दर हा 7450 रुपये आणि सरासरी दर देखील हा 7450 मिळाला आहे. 20 ऑगस्ट रोजी जर हरभऱ्याची भाव हे 9500 पर्यंत देखील नंदुरबार बाजार समितीत मिळालेले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजार समितीमध्ये समाधानकारक असा बाजार भाव हा मिळत आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.