new-img

टोमॅटोला मिळतोय सरासरी २३०० रुपयांपर्यंत भाव

टोमॅटोला मिळतोय सरासरी २३०० रुपयांपर्यंत भाव

गेल्या अनेक दिवसापासून टोमॅटोच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे. बाजारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात टोमॅटोचे दर हे घसरले आहेत. 
बऱ्याच बाजार समितीमध्ये सध्या टोमॅटोला सरासरी १५०० ते २३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २८ ऑगस्ट रोजी पुणे- पिंपरी बाजार समितीत २० क्विंटल टोमॅटोचे आवक झाली. या बाजार समितीत टोमॅटोला कमीत कमी दर हा १५०० रुपये जास्तीत जास्त दर २००० रुपये आणि सरासरी दर १७५० रुपये मिळाला आहे. २७ ऑगस्ट रोजी संगमनेर बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी १०२५ रुपये भाव मिळाला. या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाले ५१०० क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये याच दिवशी सर्वात जास्त टोमॅटोची आवक झाली. आहे ती म्हणजे २४८९८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. या बाजार समितीत टोमॅटोला सरासरी १५०० रुपये दर मिळाला आहे. जुन्नर नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी १००० रुपये भाव मिळाला आहे. तर सर्वात कमी दर हा जुन्नर नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला या दिवशी मिळाला. तर सर्वात कमी दर हा ५०० रुपये मिळाला आहे. त्यानंतर सोलापूर बाजार समितीत याच दिवशी टोमॅटोला सर्वात कमी दर हा २०० रुपये क्विंटल मिळाला आहे.