new-img

बाजारसमितीत कांद्याला किती मिळतोय भाव?

बाजारसमितीत कांद्याला किती मिळतोय भाव?

शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. बाजारात कांद्याला सध्या कांद्याला सरासरी ४५०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.  मुंबई बाजारसमितीत कांद्याची आवक वाढलेली असुन समाधानकारक असा भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात कांद्याला सरासरी ४५०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. पिंपळगाव बसवंत बााजारसमितीत कांद्याला ४५०० रूपये भाव मिळाला आहे. ५२५० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कमीतकमी दर हा बाजारसमितीत २७०० ते जास्तीतजास्त दर ५२३० रूपये भाव मिळाला आहे. मुंबई बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव हा ३३५० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर २ हजार ते ४७०० रूपये भाव मिळत आहे. या बाजारसमितीत १०९६४ क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. याच दिवशी पुणे बाजारसमितीत कांद्याला ३१५० रूपये भाव मिळत आहे. या बाजारसमितीत कांद्याची ६३५६ क्विंटल झाली आहे. कमीतकमी दर २४०० रूपये मिळाला असुन जास्तीताजास्त दर ३८०० रूपये मिळाला आहे. 
पुणे कांदा बाजारभाव-३१५० रू
मुंबई कांदा बाजारभाव- ३३५० रू
पिंपळगाव बसवंत- ४५०० रू