बाजारसमितीत सोयाबीनची आवक वाढली, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर
- By - Team Agricola
- Nov 14,2024
बाजारसमितीत सोयाबीनची आवक वाढली, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारसमितीत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी दर ४५०० रूपायंपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सरासरी दर पुणे बाजारसमितीत ३९९५ रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर ३८०० ते जास्तीतजास्त दर हा ४१९१ रूपये भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी ४३०० रूपये भाव मिळत आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर ३३०० ते जास्तीतजास्त दर ४४३० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ६७४५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.
सोयाबीन बाजारभाव
अमरावती- ३९९५ रू
अकोला- ४३०० रू
सोयाबीन आवक
अमरावती- १०६५९ क्विंटल आवक
अकोला- ६७४५ क्विंटल आवक